काव्या ची आई या
INR 250.00

काव्या ची आई या

Author: Shilpa Ghoswami शिल्पा गोस्वामी Category: Book Language: Marathi Pages: 100

Description

"काव्याची आई " चा हा एक भावनिक, संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन प्रवास अगदीच प्रामाणिकपणे मांडला आहे.प्रेम,नाती आयुष्यातील चढ-उतार आणि तिला आपसूकच भेटणारी गोड माणसं.. ज्यांच्यामुळे तिला अजून "स्पेशल फील "झालं नेमकं समाजाकडून स्पेशल मुलांना आणि त्यांच्या परिवाराला हवं तरी काय असतं याचा उलगडा कथेत होत जातो.. तसेच मातृत्वाच्या अनुभवांनी समृद्ध अशी ही एक हृदय स्पर्शी कथा आहे...

About the author
Shilpa Ghoswami  शिल्पा गोस्वामी
Shilpa Ghoswami शिल्पा गोस्वामी
निसर्गनिर्मित ब्रँडेड गोष्टी ना बाजूला सारून मानवनिर्मित ब्रँडेड गोष्टीच्या मागे धावणाऱ्या या समजात आज मी निसर्गदेवतेला नेहमीच उच्चस्थानी बघते.. बालपनिच्या जडणघडणीतूनच वाढलेल्या माझ्या अती संवेदनशील मनाला नाटकाची , नृत्याची आणि त्यामाध्यमातून घडणाऱ्या समाजप्रबोधनाची आवड आपसूकच लागली. बालनाट्य हा सुद्धा कायम जिव्हाळ्याचा विषय राहिलाय.. एक नुकतच ते पण लिहून झालंय.. एकल पालकत्वात लहानाची मोठी झाल्याने बालवयात फुलत जाणारे आपण आणि मुलांच्या मनावर उमटणारे व्रण यांच नात जवळून अनुभवले.. त्यातच निसर्गाने माझ्या पदरात "काव्या" नावाचं अतिशय निरागस, गोजिरवांनी आणि कायम टवटवीत राहणार गोंडस फुल टाकलंय.. जे मी भोगलय , जगलेय , अनुभवले ते एक आई म्हणून मला माझ्या मुलांच्या बाबतीत अगदीच अमान्यच होते.. पूर्णवेळ गृहिणी म्हणून जगणारी मी सगळ्या आवडी निवडी बाजूला ठेवून निसर्गाशी स्वतःला जुळवून घेत फार अत्यंत आनंदी आणि समाधानी ब्रँडेड जिवन भरभरून जगतेय... "*आणि म्हणून मी ब्रँडेड आहे, कारण मी काव्याची आई आहे*....!" शिल्पा प्रदीप गोस्वामी. Bsc. Agriculture M.A. Psychology मनिष नगर नागपूर.